Good news : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार 2 हजार 109 कोटींची मदत.

Good news : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार 2 हजार 109 कोटींची मदत.

Good news राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत मिळेल अशी अपेक्षा होती आणि अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. कारण आता निधी मंजूर झाला असून राज्यात निधी वितरणालाही मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लवकरच मदत वाटप करण्यात येणार आहे.

शेती पिकांचे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना काही प्रकारची मदत मिळावी व वसुलीसाठी आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी 2 हजार 109 कोटी 12 लाख 2 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Good news त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. यात अर्थातच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती, मात्र आता एक हेक्टर अधिक मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदत मंजूर केली आहे. या मदतीमुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकप्रकारे आर्थिक स्थैर्य मिळणार आहे.

Leave a Comment