Maruti Suzuki 2024 : कार खरेदी करण्याची मोठी संधी मारुतीची स्वस्त कार झाली आणखी स्वस्त

Maruti Suzuki:कार खरेदी करण्याची मोठी संधी मारुतीची स्वस्त कार झाली आणखी स्वस्त

Maruti Suzuki  देशातील सामान्य कार खरेदीदारांची पहिली पसंती मारुती सुझुकीची वाहने आहेत. याची कारणे अशी कि कमी देखभाल, चांगले मायलेज आणि परवडणारी किंमत. म्हणूनच भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुतीच्या कार नेहमीच अव्वल राहिल्या आहेत. आता एकीकडे ऑटो कंपन्या आपल्या कारच्या किमती वाढवत आहेत, तर दुसरीकडे मारुती सुझुकीने आपल्या एका कारची किंमत कमी केली आहे. त्यामुळे तुम्हाला मारुतीची सर्वात स्वस्त कार आणखी स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी आहे.

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ही गाडी कोणती? मारुती सुझुकीने सर्वात स्वस्त कार आणखी स्वस्त दरात केलेल्या कारचे नाव Alto K10 आहे. मारुती सुझुकीने आपल्या परवडणाऱ्या हॅचबॅक Alto K10 च्या किंमतींमध्ये बदल केला आहे. कंपनीने त्याच्या काही व्हेरियंटच्या किमती कमी केल्या आहेत. अल्टो K10 च्या किंमतीच्या बदलांवर एक नजर टाकूया.

Maruti Suzuki Alto K 10

Maruti Suzuki  मारुती सुझुकीच्या Alto K10 चे सर्वात मोठे आणि चांगले वैशिष्ट्य म्हणजे त्याचे इंधन कार्यक्षम इंजिन जे पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चांगले मायलेज देते. Alto K10 मध्ये, कंपनीने 999 cc 1-लिटर K सीरीज पेट्रोल इंजिन दिले आहे जे 67 bhp ची कमाल पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार पेट्रोलवर 24 किमी प्रति लीटर आणि सीएनजीवर 35 किमी प्रति लीटर मायलेज देते. म्हणजेच Alto K10 चालवण्याची किंमत बाईकच्या बरोबरीची आहे.

मारुती सुझुकीच्या Alto K10 फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, मॅन्युअली ॲडजस्टेबल ORVM सारखे फीचर्स आहेत.

Leave a Comment